-
अणूंचा चित्रपट – अ बॉय ऍंड हिज ऍटम
विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांचे संशोधनाबद्दल बरेच गैरसमज असतात. आईन्स्टाईनसारखे केस वाढलेले, विक्षिप्त स्वभाव आणि नेहमी विश्वाचा उगम कसा झाला यासारख्या गूढ आणि रहस्यमय प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतलेले लोक म्हणजे वैज्ञानिक. यात एक गृहीतक दडलेलं आहे ते म्हणजे संशोधनाच्या विषयांबद्दल. कृष्णविवर, विश्वाचा आरंभ, बिग बॅंग, पॅरेलल युनिव्हर्स, स्ट्रिंग थिअरी किंवा नुकताच प्रसिद्धीला आलेला हिग्ज बोझॉन –…
-
विनोदाच्या शोधात
विनोदी लेखकांना नेहमीच कमी दर्जाचं स्थान मिळालेलं आहे. दरबारात विदूषकाचं जे स्थान तेच साहित्यात विनोदी लेखकाचं. विनोद निर्माण करायला फारसे कष्ट पडत नाहीत असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ज्या निष्काळजीपणे लोक विनोदनिर्मिती करतात त्यात हे दिसून येतं. इथे गैरसमज नको. रोज आपण बोलताना ज्या चकाट्या पिटतो त्या काळजीपूर्वक पिटाव्यात असं म्हणणं नाही. पण विनोदी चित्रपट,…
-
फुरसत के रात दिन
डेक्कन कॉलेजचं नाव बहुतेक लोकांना पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र किंवा संस्कृत डिक्शनरी प्रोजेक्टच्या संदर्भात माहीत असतं. जे लोक तिथे सकाळी येऊन संध्याकाळी परत जातात त्यांना तिथली फक्त एक बाजू दिसते. आमचं सगळं लहानपण डेक्कन कॉलेजचा ११० एकर परिसर मनसोक्त हुंदडण्यात गेलं.