-
चांदोबा, चांदोबा भागलास का?
चांदोबामध्येही बरेचदा राक्षसाचं शीर धडावेगळं व्हायचं. इतकंच नव्हे तर पानभर चित्र काढून ते धडावेगळं केलेलं शीर आणि आजूबाजूचा रक्ताचा सडा साग्रसंगीत दाखवलेला असायचा. सुदैवाने याचा आमच्या बालमनावर परिणाम होईल या भीतीने ही मासिकं आमच्या हातातून काढून घेतली गेली नाहीत आणि आम्हालाही हळूहळू पडलेल्या मुंडक्यांची सवय झाली. दर दोन पानावर मरे त्याला कोण रडे?
-
मी दुडदुडले, ऑमनॉमनॉमनॉमनॉम – मिस चिनी आणि माऊभाषा चळवळ
मागे आम्ही विश्वसुंदरी मिस चिनी यांची मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर आमच्या कार्यालयात पत्रे, इमेल, एसएमएस आणि फोन यांची सुनामी आली. यापैकी बहुतेक फोन भारत आणि भारताबाहेरील बोक्यांकडून होते असं आमच्या लक्षात आलं कारण फोनवर बरेचदा नुसतं घर्र. . .घर्रर्र. . ऐकू येत असे. (याउलट फोन मांजरीचा असेल तर ‘हिस्स्स’.) तेव्हा या लोकाग्रहाला आणि बोकाग्रहाला मान…
-
पीटरसाहेब आणि बुकर
कालच सर पीटर स्टोथार्ड यांची मुलाखत वाचली. त्यांचे शब्द इतके प्रभावी होते की आमचे डोळे दिपले, मग गागल लावून बाकीची मुलाखत वाचली. आता इथे तुम्ही विचाराल, हे पीटर स्टोथार्ड कोण? हे ‘टाइम्स लिटररी रिव्ह्यू’चे संपादक आहेत आणि बुकर पारितोषिक निवड समितीवर आहेत. यांची दैदिप्यमान मुक्ताफळं पुढीलप्रमाणे, “पुस्तकांचं परीक्षण करणारे बरेच ब्लॉग आहेत हे चांगलंच आहे…