-
हिग्ज वि. बोस
हिग्ज बोसॉन१ सापडल्याची बातमी आल्यावर भारतीय मिडीयाने वेगळाच सूर लावला. आधी ट्याब्लॉइड ऑफ इंडियात ही बातमी वाचली पण त्याचा आणि आमचा संबंध फक्त कधीतरी भेळ खाताना येत असल्यामुळे ते फारसे गंभीरपणे घेतले नाही. पण हिंदूसारख्या बर्यापैकी समतोल वृत्तपत्राने यावर चक्क संपादकीय काढावे म्हणजे फार झाले. मुद्दा काय तर हिग्ज बोसॉनचे श्रेय सत्येंद्रनाथ बोस यांना मिळाले…
-
वर्णभेदाच्या वास्तवाचे प्रभावी चित्रण – द हेल्प
इतिहास बरीच गुंतागुंतीची गोष्ट आहे. जेव्हा एखादी क्रांतीकारक घटना घडते तेव्हा तिची इतिहासात कोरडी नोंद असते. इतिहास कोण लिहीतो यावर त्या नोंदीचे स्वरूप अवलंबून असते मात्र त्यात इतर आयामांना फारशी जागा नसते. त्या घटनेचे तिथल्या लोकांवर काय परिणाम झाले, त्यांचे रोजचे आयुष्य यामुळे कसे बदलले यावर इतिहास बहुतेक वेळा मौनच बाळगतो. कोरड्या नोंदींच्या ओळींमध्ये हजारो…
-
वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज
दाऊद इब्राहीमला चारचौघात कुणी विचारलं की तुम्ही काय करता तर तो काय उत्तर देतो माहीत नाही. आणि प्रश्न विचारणारा उत्तर ऐकण्यासाठी शिल्लक राहतो का ते ही माहीत नाही. पण आपल्याकडचे काही पालक दाऊदलाही त्याच्या प्रोफेशनमध्ये ‘स्कोप’ आहे का हे विचारायला कमी करणार नाहीत. हे सांगायचं कारण म्हणजे मला हा प्रश्न बरेचदा विचारण्यात येतो. प्रश्न विचारणारे…