-
स्नूपी, चार्ली ब्राऊन आणि मंडळी
कॉमिक स्ट्रिप म्हणजे तीन किंवा चार चौकोन असलेली (रविवारी जास्त), ठराविक पात्रे असलेली आणि त्यांची गोष्ट सांगणारी मालिका. मात्र कॉमिक स्ट्रिपच्या कलाकारांचा उल्लेख कार्टूनिस्ट असाही केला जातो त्यामुळे या दोन प्रकारातील फरक तितका स्पष्ट नाही. कॉमिक स्ट्रिपचा उदय ‘वर्तमानपत्रातील मोकळी जागा भरणे’ या कारणासाठी झाला आणि आजही त्यामागचे मुख्य कारण तेच आहे. अर्थात आता आंतरजालामुळे…
-
इंडिया आफ्टर गांधी : एका अनपेक्षित देशाचा इतिहास
शाळेत असताना डोक्यावर विज्ञानाचे भूत होते. याचा एक परिणाम म्हणजे कला शाखा आणि प्रामुख्याने इतिहास, नागरिकशास्त्र यांच्याकडे दुर्लक्ष झाले. सनावळी आणि तहांच्या तारखा घोकून पाठ करण्यापलिकडे इतिहासाचे महत्व काय हे ठाऊक नव्हते. ते महत्व लक्षात आणून द्यायला देतील असे शिक्षकही नव्हते, किंबहुना त्या शिक्षकांनाही ते महत्व कळले होते की नाही याबद्दल शंका वाटते. शाळेत शिकलेल्या…
-
आटपाट नगर होतं
विदा यथावकाश विद्याच्या मेजावर आला. विद्याने विद्याची धारिका उघडली. विद्याचे लांबलचक रकाने पाहून विद्याला कंटाळा आला, तरीही आळस झटकून ती कामाला लागली. तासाभरात विद्याचे विश्लेषण पूर्ण झाले. विद्याने विद्याची धारिका तिच्या वरिष्ठांकडे पाठविली. वरिष्ठ क्रमांक एकना विद्याचे काम आवडले.