• कलकत्ता त्रिधारा आणि इतर काही

    रे यांनी ‘कलकत्ता त्रिधारे’खाली तीन चित्रपट केले – ‘प्रतिद्वंदी’ (१९७०), ‘सीमाबद्ध’ (१९७१) आणि ‘जन अरण्य’ (१९७६). तिन्हीमध्ये विषय साधारणपणे सारखेच – बेकारी, शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि व्यवसाय किंवा नोकरी मिळालीच तर ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भानगडी.