-
संवादाचा सुवावो
आपल्याकडच्या बर्याच गुन्हेगारांचं तिकडे पुनर्वसन झालं. मराठीतल्या शिष्टला तिकडे म्यानर्सच्या क्लासमध्ये घातलं, त्याचा अर्थ बंगालीत सुसंस्कृत असा झाला. संस्कृतचे कितीतरी शब्द मराठीत उपरे, औपचारिक वाटतात, त्यांचा बंगालीत पूर्ण कायापालट होतो.
-
आर्यांच्या शोधात
‘आर्यांच्या शोधात’ सारखे आपल्या पूर्वजांचा मागोवा घेणारे पुस्तक वाचल्यावर समाज आणि संस्कृती यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपण कळत आणि नकळत ‘मोठ्या चित्राचा’ विचार करायला लागतो. संस्कृतीच्या नावाखाली आपण आज ज्या चालीरीती क्षणाचाही विचार न करता वापरतो, त्यांचा उगम आणि प्रसार कुठे, कधी, कसा झाला हे जाणून घेणे हा एक रोमांचकारी अनुभव ठरतो.
-
मर्मबंधातली ठेव ही
इथे प्रश्न पडतो की हे खंदे लोक जर भूतकाळात रमू शकतात तर बिचाऱ्या मराठी माणसानेच काय घोडं मारलं आहे? मुद्दा वेगळा आहे. भूतकाळात रमणे हा गुन्हा नाही, पण रमल्यानंतर तुम्ही त्या अभिव्यक्तीला कोणत्या प्रकारे प्रगट करता हे महत्त्वाचं आहे.