-
गुण गाईन आवडी
लेख खरंतर उशिरा येतो आहे. डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली तेव्हा यायला हवा होता पण तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या मिडियामध्ये जयजयकाराच्या घोषणा दुमदुमत होत्या. मागच्या लेखामध्ये आलेला एक धागा याही लेखात आहे – व्यक्तिपूजा आणि निरपेक्ष मूल्यमापन. साधारणपणे राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्या कारकीर्दीचं वेळोवेळी मूल्यमापन होत असतं. गांधी-नेहरू यांनी…
-
क्लॅप्टन इज गॉड
एरिक क्लॅप्टनचा जन्म इंग्लंडमधल्या रिपली नावाच्या एका लहानशा खेड्यात झाला. लहानपणीच त्याला आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे जाणवलं. तो खोलीत आला की सगळे लोक क्षणभर स्तब्ध व्हायचे. त्याच्याबद्दल नातेवाइकांमध्ये कुजबूज चालू असायची. शेवटी त्याला कळलं की ज्यांना तो आई आणि बाबा म्हणतो ते त्याचे आजी-आजोबा आहेत. त्याची सख्खी आई त्यांची मुलगी. युद्धादरम्यान एका सैनिकाबरोबर झालेल्या…
-
गाव मागचा मागे पडला
ख्रिस स्ट्युअर्ट ‘जेनेसिस’ या बॅंडमधला ड्रमर. दोन अल्बम केल्यानंतर संगीताचे क्षेत्र सोडून युरोपमध्ये फिरून मेंढ्यांची लोकर काढणे, प्रवासविषयक पुस्तके लिहीणे अशी कामे केली. अखेर इंग्लंडमधले राहते घर विकून स्पेनमधल्या अन्दालुचिया या चिमुकल्या गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘ड्रायव्हिंग ओव्हर लेमन्स’ ही या प्रवासाची गोष्ट. अन्दालुचियावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली, एका बाजूला बर्फाने आच्छादित पर्वत, घराजवळूनच…