• गुस्ताव्ह फ्लोबेर, पोपट आणि कादंबरी

    सार्वजनिक माध्यमांमध्ये काही आरोळ्या विशेष लोकप्रिय असतात. राज्य पातळीवर ‘मराठी भाषेचा लोप होतो आहे’ ही जशी नेहमी उठणारी आरोळी आहे तशीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘कादंबरी हा प्रकार आता मृत झाला आहे (यावेळी अगदी नक्की बरं का!)’ हीसुद्धा नेहमी ऐकू येणाऱ्या आरोळ्यांपैकी एक. जागतिक स्तरावर कादंबरीच्या स्वरुपात गेल्या दोन-तीन शतकात अनेक बदल झाले. ग्रॅंट स्नायडरने हे एका…


  • भारतीय गुप्तचर यंत्रणेचे वास्तव : एस्केप टू नोव्हेअर

    हेरगिरी हा लेखकांचा आणि चित्रपट निर्मात्यांचा आवडता विषय असतो कारण यात कथानक मनोरंजक करण्यासाठी आवश्यक असलेले बरेचसे घटक आधीच असतात. अर्थात याचा अर्थ हेरगिरीचं सर्व चित्रण वास्तवाला धरून असतं असा नाही. ‘मिशन इम्पॉसिब्ल’मध्ये सीआयएमध्ये प्रवेश करायला टॉम क्रूझला अर्धा चित्रपट लागतो, तेच काम ‘बॉर्न अल्टीमेटम’मध्ये जेसन बॉर्न अडीच मिनिटात करतो. खरं काय कुणास ठाऊक. अर्थात…


  • देवा हो देवा, आनंद देवा

    प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात, लोकशाहीचेही आहेत. उत्तर कोरियात सर्व पुरुषांनी किम जोंगसारखा हेअरकट करावा असं फर्मान निघालं आहे. भारतात हे शक्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं. ही अर्थातच चांगली गोष्ट आहे पण याचा तोटा हा की प्रत्येकाला कोणत्याही विषयावरचं आपलं मत सर्वश्रेष्ठ वाटायला लागतं. राजकारणापासून क्रिकेटपर्यंत सर्व विषयांवर सर्वांची…