-
एक डाव मृत्युशी – द सेवन्थ सील
चित्रपट बघण्याची प्रत्येकाची कारणं आणि पद्धत वेगवेगळी असते. चित्रपट बघण्यामागच्या हेतूंमध्येही बरेचदा फरक असतो. काही लोक फक्त मनोरंजनासाठी चित्रपट बघतात, काहींना त्यातून आणखी काहीतरी हवं असतं. चित्रपटांचं वर्गीकरण अनेक प्रकारे केलं गेलं आहे. एक ढोबळ प्रकार म्हणजे जे चित्रपट बघताना फारसं डोकं वापरावं लागत नाही असे आणि जे डोक्याला त्रास देतात असे. जेम्स बॉन्डचे कितीही…
-
नायपॉल, अमर्त्य सेन आणि भारत
गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या साहित्य महोत्सवाचे जीवन गौरव पारितोषिक व्ही. एस. नायपॉल यांना देण्यात आले. नंतर गिरीश कर्नाड यांनी त्यांच्या भाषणात या निर्णयावर कडाडून टीका केली. या टीकेचा मुख्य मुद्दा नायपॉल यांचे मुसलमानांबद्दलचे लेखन पूर्वग्रहदूषित आहे हा होता. कर्नाड यांनी ज्या पुस्तकांबद्दल ही टीका केली आहे ती पुस्तके म्हणजे ‘ऍन एरिया ऑफ डार्कनेस’, ‘इंडिया :…
-
अ शो अबाउट नथिंग
पूर्वीच्या काळी – म्हणजे भारत आर्थिक महासत्ता वगैरे व्हायला लागण्याच्या अगोदर – कोणतीही चांगली गोष्ट – पेणसिलीपासून ते मोटारगाडीपर्यंत – म्हणजे फारिन मेड हे समीकरण ठरलेले असे. आता सुदैवाने काळ बदलला आहे, सगळ्या वस्तू इथे मिळायला लागल्या आहेत. तरीही एका गोष्टीसाठी मात्र अजूनही पल्याडचे तोंड बघावे लागते आणि ती म्हणजे विनोद. विनोद हे माणसाचे नाव…