-
व्हॅटिकन : एक अनभिषिक्त, कलंकित साम्राज्य
व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स चौकात गेल्यावर पहिला शब्द मनात आला तो म्हणजे भव्यता. जे समोर दिसते आहे त्याचे वर्णन शब्दातीतच नव्हे तर इतर कुठल्याही प्रकारे करणे अशक्य आहे याची जाणीव होते. म्हणूनच कॅमेराही निरूपयोगी ठरतो. मग सेंट पीटर्स बसिलिकेमध्ये गेल्यावर मायकेल एंजेलोच्या दैवी देणगीचा आविष्कार बघताना ही भावना द्विगुणित होते. कथिड्रलच्या डोमपर्यंत ३३० पायर्या चढताना…
-
दोन आडवाटेवरचे चित्रपट
चित्रपट बघण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, माझी काहीशी तर्हेवाईक आहे. काही अपवाद सोडले तर मी सध्या गाजत असलेले चित्रपट बघितलेले नाहीत. ते माझ्या यादीत आहेत पण बघायची वेळ येईस्तोवर वर्ष-सहा महिने उलटून गेलेले असतात. यामागची कारणमीमांसा म्हणजे अमुक वेळी अमुक चित्रपट बघायचा किंवा नाही हे ठरवणे. चित्रपटाची जातकुळी आणि आपला त्यावेळचा मूड हे जुळत नसतील…
-
द ट्रायल
काफ्काचे कोणतेही पुस्तक वाचताना बहुतांशी पहिली प्रतिक्रिया उमटते ती म्हणजे वाचक भंजाळून जातो. हे नेमकं चाललंय काय असा प्रश्न त्याला पडतो. एखाद्याचे डोळे बांधून त्याला बरंच चालवत नेलं आणि मग डोळ्यावरची पट्टी काढून टाकली तर त्याची जशी अवस्था होईल तशी काहीशी अवस्था या वाचकाचीही होते. पट्टी काढलेला माणूस आजूबाजूला बघतो, आपण कुठे आहोत याचा शोध…