• ऑपरेशन ओव्हरलॉर्ड

    ६ जून १९४४ – आज या दिवसाला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. दुसर्‍या महायुद्धातील जर्मनीविरूद्ध निर्णायक ठरलेली नॉर्मंडी या दक्षिण फ्रान्सच्या तटावरील दोस्त राष्ट्रांची चढाई या दिवशी झाली. ७००० जहाजे, १३,००० वेगवेगळ्या प्रकारची विमाने आणि १५०,००० ते १७५,००० भूदल सैनिक असा अगडबंब ताफा असलेली ही चढाई मानवी इतिहासातील सर्वात मोठी सुनियोजित चढाई म्हणून ओळखली जाते.…


  • प्रिंस ऑफ डार्कनेस

    सिनेमॅटोग्राफर गॉर्डन विलिस यांचं काल निधन झालं. साधारणपणे चित्रपट अभिनेत्यांच्या नावावर ओळखले जातात, दिग्दर्शकही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतात. पण इतर कलाकार मात्र बहुतेक वेळा पडद्यामागेच राहतात. अभिनेते किंवा दिग्दर्शक नसूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये विलिस यांचं नाव वरच्या क्रमांकात घ्यावं लागेल. गॉडफादरसारखी अप्रतिम कलाकृती जशी अल पचिनो किंवा ब्रॅंडोच्या अभिनयासाठी बघावीशी वाटते…


  • थोरोचं वाल्डेन

    वाल्डेनची खोली अमर्याद आहे असं ऐकल्यानंतर स्वत: नावेतून तळ्याची खोली मोजणारा, वाल्डेनच्या काठी निसर्गाचं निरिक्षण करत तासनतास घालवणारा, उरलेला दिवस मी काहीही केलं नाही असं नि:संकोचपणे सांगणारा, एका झाडाशी आज भेट ठरली आहे म्हणून मैलोनमैल बर्फ तुडवत जाणारा, असा हा थोरो.