-
दो काफी
मला चहाचे व्यसन आहे. चेटकिणीचा जीव जसा दूर ठेवलेल्या पोपट किंवा तत्सम पक्ष्यात असायचा तसा माझा जीव चहाच्या एका कपात आहे. दिल्लीला जाताना रात्री दोन वाजता, मध्यप्रदेशात कुठेतरी नकाशावर अस्तित्व नसलेल्या एका गावातल्या टपरीवर, अर्धवट झोपेत असलेल्या भैयाच्या हातचा चहा पिताना जे वाटलं त्यालाच ज्ञानी लोक ब्रम्ह वगैरे म्हणत असावेत. अशी ‘मागची बॅकग्राउंड’ असताना, इटलीत…
-
ऑल द प्रेसिडेंट्स मेन
चित्रपट पांढर्या पार्श्वभूमीवर सुरु होतो. कदाचित पांढरा पडदा असावा किंवा दुसरे काही, अंदाज येत नाही. पाच सेकंद, दहा, पंधरा काहीच होत नाही. शेवटी वैतागून आपण चुळबूळ करायला लागतो तेवढ्यात बंदुकीतून गोळी सुटल्यासारखा आवाज येतो, कॅमेरा फोकस होतो आणि पडद्यावर J हे अक्षर उमटते. आपण टंकलेखन क्लोजअप मध्ये बघतो आहोत हे लक्षात येता येता ओळ टंकीत…
-
ऑलिव्हर स्टोन आणि जेएफके
मला आवडणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘पोलिटिकल थ्रिलर’ हा जोन्र प्रमुख आहे. दुर्दैवाने या प्रकारचे चित्रपट विशेष लोकप्रिय होत नाहीत असा गैरसमज आहे त्यामुळे असे चित्रपट फार निघातही नाहीत आणि जे निघतात त्यातले चांगले चित्रपट फारच कमी असतात. मराठीत ‘सिंहासन’चा सन्माननीय अपवाद वगळता त्या दर्जाचा दुसरा चित्रपट आठवत नाही. ‘आंधी’चं वैशिष्ट्य हे की त्या काळात इंदिरा गांधींवर व्यक्तिरेखा…