जेव्हा मी पुणे विद्यापीठात (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) पीएच.डी.चा विद्यार्थी होतो, तेव्हा आमचा पदार्थविज्ञान विभाग हा सर्वोत्कृष्ट निधी प्राप्त विभागांपैकी एक होता. यामागे प्रा. वि. ग. भिडे 1 यांच्या अथक प्रयत्नांचा मोठा वाटा होता. त्यांनी निधी देणाऱ्या एजन्सींना विद्यापीठ विभागाला अनुदान देण्यासाठी भाग पाडले. परिणामी, आम्हाला फिजिकल रिव्ह्यू, सायन्स आणि नेचर यासारख्या सर्वोत्तम मासिके वाचायला मिळाली. तरीही, अशी अनेक मासिके होती ज्यात जी आम्हाला उपलब्ध नव्हती आणि ती वाचण्यासाठी आम्ही पर्यायी उपाय शोधून काढले होते.
जेव्हा विभागातील कुणीतरी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) सारख्या मोठ्या संस्थेला भेट देण्यासाठी जात असे, तेव्हा ती मित्र आणि सहकाऱ्यांच्या संदर्भांची यादी घेऊन जात असे. लायब्ररीत जाऊन शोधनिबंधांची छायाप्रत काढण्यासाठी तिला थोडा वेळ द्यावा लागत असे.
मी माझ्या संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या वेबसाइट्सचा शोध घेत असे. मी त्यांना ईमेल करत असे आणि ते उदार मनाने पोस्टाने प्रीप्रिंट असत. जर्नल्स ऑनलाइन आल्यानंतर ते पीडीएफ फाइल्स असत. नंतर जेव्हा मी युरोपमध्ये पोस्टडॉक करत होतो, तेव्हा मला नियमितपणे भारतातून संदर्भांसाठी विनंत्या येत असत आणि मलाही माझ्या सहकाऱ्यांना मदत करण्यात संतोष वाटत असे.
बहुतेक संशोधन मासिकांसाठी सदस्यत्वाची वर्गणी डोळे पांढरे होण्याइतकी जास्त असते, विशेषत: संस्थांसाठी. आणि जर तुम्हाला एकच शोधनिबंध खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत $२५ ते $७० पर्यंत काहीही असू शकते आणि कधीकधी प्रवेश केवळ एका दिवसासाठी मर्यादित असतो! त्यामुळे भारतातील छोट्या संस्था आणि विद्यापीठांमधील संशोधकांना वर वर्णन केलेल्या पद्धतींचा अवलंब करण्याशिवाय पर्याय नव्हता. ही सद्य परिस्थिती होती.
२५ नोव्हेंबर २०२४ रोजी, मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकारने इनफ्लिबनेटद्वारे ३० प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रकाशकांच्या १३,००० हून अधिक ई-जर्नल्सची सदस्यता घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. ३ वर्षांसाठी ६,००० कोटी रुपये (७१५ दशलक्ष डॉलर्स) च्या अर्थसंकल्पीय तरतूदीसह, ओएनओएसमध्ये समाविष्ट जर्नल्स विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून मानव्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञानापर्यंत विविध शाखांमध्ये पसरलेली आहेत.
जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या ओएनओएसमुळे भारतभरातील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि महाविद्यालयांसह ६,३०० हून अधिक संस्थांना फायदा होणार आहे. विशेषत: टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील संस्थांसाठी फायदेशीर ठरेल, जिथे आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रवेश प्रतिबंधित होता. आयआयएम मुंबईच्या म्हणण्यानुसार, ओएनओएस संशोधन खर्च १८% पर्यंत कमी करू शकते.
भारतीय संशोधकांसाठी या निर्णयाचे महत्त्व नाकारता येणार नाही. कोणत्याही क्षेत्रातील संशोधन अत्यंत स्पर्धात्मक झाले आहे आणि दर आठवड्याला किंवा महिन्याला नवीन शोध लागत असतात. अद्ययावत संशोधन नियतकालिके उपलब्ध असणे संशोधकांसाठी नितांत आवश्यक आहे. ती नसतील तर संधोधन करणे अत्यंत कठीण होऊन बसते.
मुद्रणाच्या शोधामुळे ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचले. ओएनओएस उपक्रमामुळे ज्ञानाच्या उपलब्धतेचे लोकशाहीकरण होईल जेणेकरून भारतातील प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञाला तिच्या क्षेत्रातील अद्ययावत संशोधनात विनामूल्य प्रवेश मिळेल. हे पाऊल भारतातील संशोधनाच्या प्रगतीच्या दिशेने मोठी मदत करेल.
शेतीचे जीवन आणि दमा
गेल्या १०० वर्षांत बव्हेरियन टेकड्यांवरील शेतीत फारसा बदल झालेला नाही. स्त्रिया , मुलांसोबत गोठ्यांची देखभाल करताना गाई, कोंबड्यांशी दररोज संपर्कात असतात. आणि धक्कादायक शोध असा आहे की आजूबाजूच्या शहरांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या तुलनेत या शेतात राहणाऱ्या मुलांमध्ये दम्याचे प्रमाण निम्म्याच्या आसपास आहे.
शेतकऱ्यांची मुले अधिक निरोगी कशामुळे होत आहेत? हे अनुवंशशास्त्र असू शकत नाही कारण शेतात आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचा अनुवांशिक मेकअप समान असतो.
असे दिसून आले आहे की गोठ्यातील धूळ हा तो जादूई घटक आहे जो या मुलांना दम्यापासून वाचवत आहे.
गायीच्या गोठ्यातील धुळीत एंडोटॉक्सिन नावाचा पदार्थ असतो – म्हणजे “ग्रॅम निगेटिव्ह” जीवाणूंच्या पेशी भिंतीचे तुटलेले तुकडे. मूल जन्माला आल्यावर सर्व प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी तिची रोगप्रतिकारक शक्ती हाय अलर्टवर असते. नंतर, रोगप्रतिकारक शक्ती वास्तविक धोके आणि काल्पनिक धोके यांच्यात फरक करण्यास शिकते. अस्थमा रुग्णांमध्ये (आणि ॲलर्जीने ग्रस्त) रोगप्रतिकारक शक्ती नेहमीच आक्रमक अवस्थेत असते. गायीच्या गोठ्यांमधील धूळ रोगप्रतिकारक शक्तीला अधिक सहिष्णू होण्यासाठी प्रशिक्षित करते आणि स्थिर होण्यास मदत करते.
काही शास्त्रज्ञ असा सल्ला देतात की मुले आणि अगदी गर्भवती महिलांनी त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीस मदत करण्यासाठी शेतात आणि गोठ्यात जावे. भारताला शेतीची मोठी परंपरा आहे आणि शेती आणि गोठे मुबलक आहेत. बालवाड्या शेतआणि गोठ्यांना भेटी देण्याची व्यवस्था करू शकतात. मोठी मुले ज्यांना शेतीची आवड आहे ते शेतात छोटे प्रकल्प देखील करू शकतात ज्यामुळे त्यांना निसर्गात अधिक वेळ घालवता येईल.
सूर्यप्रकाश, माती, वनस्पती आणि प्राणी या नैसर्गिक सजीवांच्या संपर्कात आल्याने मुले अधिक निरोगी होतात, हे दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. मांजर आणि कुत्रा यासारखे पाळीव प्राणी देखील मुलासाठी चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीस हातभार लावू शकतात.
- विद्यार्थी आणि सहकाऱ्यांमध्ये ओळखले जाणारे ‘भिडे सर’ हे थोर शास्त्रज्ञ आणि दूरदृष्टी असलेले होते. त्यांच्या काही व्याख्यानांना उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आणि विशेषतः एका व्याख्यानात त्यांनी ‘विचारांच्या स्पष्टते’चे (clarity of thinking) महत्त्व अधोरेखित केले. या संकल्पनेची माझ्या लेखनासह अनेक प्रकारे मला मदत झाली आहे. थोर व्यक्त्तींचे एक लक्षण असे आहे की त्यांच्या अफाट भांडारातील ज्ञानाचा एक कणसुद्धा जीवनपरिवर्तनकारी ठरू शकतो. म्हणूनच पुस्तके मौल्यवान आहेत. अवकाश आणि काळ यांच्या अंतराची पर्वा न करता पुस्तके आपल्याला भूतकाळ आणि वर्तमानातील महान मनांशी थेट संवाद साधण्याचा मार्ग देतात. ↩︎
Leave a Reply